… अखेर शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या म्हणण्यावर मौन सोडले : पहा काय म्हणाले ?

शेअर करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ पवार यांच्या मागणीनंतर भाजपला उकळ्या फुटू लागल्या होत्या. मात्र शरद पवार यांनी या विषयावर आपले मौन सोडले असून पार्थ पवार हे इमॅच्युअर असून त्याच्या मताला किंमत नसल्याचे म्हटले आहे .

शरद पवार म्हणाले, ” माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्ष ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल तर मी विरोध करणार नाही “

पुढे शरद पवार म्हणाले, ” सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होते, पण याची ज्या पद्धतीने चर्चा होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटते. परवा मी साताऱ्यात होतो. त्यावेळी एका शेतकऱ्याने मला याबद्दल विचारले. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. त्याने सांगितले 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची मीडियात नोंदही नाही. त्यावरुन सर्वसामान्यांची भावना माझ्या लक्षात आली “

शरद पवार यांचे हे विधान मीडियात येताच नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारचे कौतुक केले आहे . ‘आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है… थांबू नकोस मित्रा !’ असे ट्विटर नितेश यांनी केले आहे . पार्थ पवार यांनी याआधी देखील ‘ जय श्रीराम ‘ म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते .

पार्थ पवार यांची भूमिका ही महाविकास आघाडी सरकारसोबत नसल्याचे दिसत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर भाजपची भूमिका पार्थ पवार मांडत असल्याने अजून काही दिवस हा विषय मीडियात चर्चेत राहील यात शंका नाही. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.


शेअर करा