हिम्मत तर पहा..चक्क कोरोना सेंटरमधल्या सोलापुरी चादरी चोरून चालला होता

शेअर करा

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे उघडकीला आली असून 65 एकर मध्ये उभे केलेल्या कोरोना सेंटरमधील 54 चादरी 74 बेडशीट असा सुमारे 18 हजार रुपयांचा माल एक चोरटा घेऊन चालला होता मात्र सेंटरच्या वॉचमनने त्याला रंगेहात पकडले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

उपलब्ध माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे ही घटना उघडकीला आली असून फेब्रुवारी 2022 मध्ये कोरोना सेंटर लाट ओसरल्यानंतर बंद करण्यात आले होते . 65 एकर सरकारी कोरोना सेंटरमधील साहित्य बंद करून त्याला कुलूप लावण्यात आलेले होते. 24 एप्रिल रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास हे साहित्य एक जण मोटारसायकलवर घेऊन जाताना आढळून आल्यावर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्याने हे साहित्य कोरोना सेंटरमधून सोडल्याचे समोर आले.

संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बरेचसे साहित्य ठेवले होते त्या ठिकाणी आढळून आले नाही. वॉचमन अनिकेत जाधव आणि विजय भादुले यांनी पकडलेल्या तरुणाची माहिती घेतल्यानंतर चांद पैगंबर मुजावर ( वय 26 राहणार पोहोरगाव तालुका पंढरपूर) हा सेंटरमधील बेडशीट आणि चादर यांची चोरी करताना आढळून आला त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग ढवळे करत आहेत.


शेअर करा