खळबळजनक..’ आई, मध्यस्त आणि तो ‘ , एकच मर्दानी भिडली परिवारासोबत..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून वयाच्या 14 व्या वर्षी आईने नाशिक जिल्ह्यातील एका युवकासोबत एका मुलीचा बालविवाह लावून दिला होता. सदर प्रकरणी ज्या व्यक्तीने मध्यस्ती केली त्याच्यावर अल्पवयीन विवाहितेने एक वर्षांनी तक्रार दाखल केली असून आई आणि मध्यस्थ आणि या मुलीचा पती यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सातारा पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा 2021 आली नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एका 28 वर्षीय मुलासोबत विवाह लावून देण्यात आला होता. या विवाहाला मुलीचा विरोध होता मात्र आईने जबरदस्ती करत तिला लग्नासाठी तयार केले त्यानंतर मुलगी सासरी राहायला गेली तेव्हा तिच्या इच्छेविरुद्ध लग्न झालेले असल्याने तिने पतीला शारीरिक संबंध ठेवू दिले नाही म्हणून पती तिला मारहाण करायचा त्यानंतर तिने या प्रकाराची आईला माहिती दिली तरी देखील आई तिला सासरी रहा म्हणून आग्रह करत होती अखेर मुलीने सासर सोडून माहेर गाठले.

माहेरी आल्यानंतर काही दिवसात पती पुन्हा सासरी आला आणि त्याने तिला सोबत चल म्हणून आग्रह दिला तर आईने देखील जावयाची बाजू घेत मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर मुलीने आईच्या विरोधात सातारा ठाण्यात तक्रार दिली आणि अखेर तिने आईचे देखील घर सोडले आणि मैत्रिणीकडे राहायला गेली. मुलगी सासरी जातच नसल्याने मध्यस्थ व्यक्ती हा मुलीची बदनामी करत होता त्याच्या घरी जाऊन मुलीने माझी बदनामी करू नका असे सांगितले त्यावेळी त्याने आईला बोलावून घेतले आणि आईने पुन्हा मध्यस्थ आणि याच्या मदतीने मुलीला त्रास दिला. चाईल्ड लाईन संस्थेला मुलीने फोन केला आणि त्यानंतर वेदांत नगर पोलिस ठाण्यात आई मध्यस्थ आणि पतीच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.

अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविल्यानंतर सदर मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे किंवा नाही याची विचारणा पोलिसांनी केली असता ‘ तिने माझ्यासोबत कोणताही गैरप्रकार आत्तापर्यंत झालेला नाही आणि तो मी करून देखील दिलेला नाही ‘ असे स्पष्ट शब्दात ठणकावले त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यास देखील तिने नकार दिला. आपला पती हा आपल्याला पसंत नाही त्यामुळे सासरी नांदायला जायचे काही कारणच नाही, असे देखील तिने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


शेअर करा