नगरमध्ये राज ठाकरेंनी केलेले जेवण ‘ व्हेज कि नॉनव्हेज ? ‘

शेअर करा

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियात वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील सभा आटोपून राज ठाकरे यांनी मुंबईकडे जाताना नगर शहराजवळ केडगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले होते त्यावेळी त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याने यांच्यावर सोशल मीडियावर चांगलीच टीका झाली होती. शनिवारी औरंगाबाद येथे जाताना राज ठाकरे केडगावमधील एका हॉटेलमध्ये थांबले मात्र त्यांनी यावेळी शाकाहारी जेवण पसंत केले.

फेब्रुवारी 2020 मध्ये औरंगाबाद येथील सभा आटोपून शनिवारी मुंबईला जात असताना राज ठाकरे यांनी केडगाव येथील एका हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थ खाल्ले होते त्यानंतर जेवण आवडल्याचा देखील शेरा त्यांनी हॉटेलमध्ये लिहून ठेवलेला आहे. काही दिवसांपासून त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणू असा इशारा दिल्यानंतर स्वतःला हनुमान भक्त म्हणणारे राज ठाकरे शनिवारच्या दिवशी मटन खातात अशी प्रक्रिया सोशल मीडियावर उमटली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी केडगाव येथे शाकाहारी जेवण घेतल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली असून हा ‘ हनुमान चालीसा इफेक्ट ‘ आहे काय अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत .


शेअर करा