लॉकडाऊनमध्ये मावशीच्या घरी मुलीला ठेवले मात्र मावशीने केले ‘ असे काही ‘ की प्रकरण पोहचले पोलिसात

  • by

एकीकडे कोरोनाने पूर्ण देश त्रस्त झालेला असताना दुसरीकडे अगदीच अकल्पनीय अशा घटना देशात समोर येत आहेत . महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने बळजबरीने पोर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मावशी आणि तिचा प्रियकर देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना असून एप्रिल महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी सोडले होते. तिथे मावशीचा प्रियकर देखील येत होता काही कालावधीनंतर ह्या चावट मावशीने मुलीसारख्या असलेल्या आपली बहिणीच्या मुलीला देखील ‘ तसे ‘ फोटो आणि व्हिडीओ दाखवले.

काही कालावधीनंतर, पीडित मुलगी आपल्या घरी परतली आणि आपल्या मावशीचे कारनामे आईला सांगितले. बहिणीचा हा धक्कादायक प्रकार पाहून मुलीच्या आईला देखील मानसिक धक्का बसला आणि तिने पीडित मुलीला घेऊन या महिलेनं पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत मुलीच्या आईच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मावशी व तिचा प्रियकर दोघांनाही अटक केली आहे .

लॉकडाउनच्या काळात पीडित मुलीला जेव्हा बहिणीच्या घरी सोडले होते. तेव्हा आरोपी महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी कायम यायचा त्यावेळी हा सर्व प्रकार घडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. लॉकडाउनमुळे तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने तिने हा त्रास सहन केला. मुलीची मावशी व तिचा प्रियकर यांनी पीडित मुलीला जबरदस्ती करत पोर्न व्हिडिओ दाखवले. आरोपी मावशी आणि तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत अत्याचार केल्याचे देखील मुलीचे म्हणणे आहे. काही दिवस त्यांचा हा अत्याचार सहन केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परतली तेव्हा सगळा प्रकार आईला सांगितला.

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने असा काही प्रकार घडलाच नाही म्हणून हात वर केले मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. अटक केल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी या दोघांची कोरोनाचा चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यामुळे त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांचीही रवानगी तुरुंगात करण्यात येणार असल्याचे समजते.

बहिणीने आपल्या मुलीसोबत अत्यंत खालच्या पातळीचे वर्तन केल्यामुळे पीडितेच्या कुटु्ंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. पोलीस केस दाखल होताच ह्या घटनेची इतर नातेवाईकांत देखील माहिती झाली. मावशीच्या या काळ कृत्यावर सर्वानी तीव्र संताप व्यक्त केला असून मावशी व तिच्या प्रियकरास कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांकडे केली आहे.