रिया बोल ना माझ्याशी ? ‘ ह्या ‘ युवकाला उपद्रवींनी सळो की पळो करून सोडले : काय आहे बातमी ?

शेअर करा

आपल्या देशातील मीडिया विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उतावीळपणा काही लपून राहिलेला नाही . सरकारचे पीआरओ असल्यासारखे कोणत्याच गोष्टीचा कुठलाच अभ्यास न करता आल्या सरकारी बातम्या सरळ लोकांवर थोपवण्यात येत आहेत मात्र अशाच एका हिंदी वृत्तवाहिनीच्या उतावीळपणाचा फटका कोल्हापूरातील एका तरुणाला बसला असून त्या चॅनेलने चक्क रिया चक्रावतीचे मोबाईल नंबर कनेक्शन म्हणून कोल्हापूर येथील सागर सुर्वे या युवकाच्या मोबाईल नंबरशी मिळताजुळता क्रमांक स्क्रीनवर दाखवला त्यामुळे अनेक जणांनी आपण रिया चक्रवर्ती हिलाच कॉल करतोय,असे समजून सागर सुर्वे यांना कॉल करणे सुरू केले.

अभिनेता सुशांतसिहच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती हिची चौकशी खूप सखोल होत आहे मात्र अशा रीतीने मोबाईल नंबर मीडियात दाखवून काय मिळेल हे ते चॅनेलवाले जाणोत मात्र काही दिवसांपूर्वी एका खासगी हिंदी टीव्ही चॅनेलने स्क्रिनवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून नंबर दाखवला.रियाच्या नंबरशी साध्यार्म्य असलेला केवळ एक अंक बदल असलेला नंबर सागर सुर्वे नावाच्या तरुणाचा असून काही दिवसांपासून सागरला सतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज येत असून बोलण्याचा आग्रह करण्यात येत आहेत .

‘रियाशी बोलायचं आहे.तुझे फोटो पाठव’ यासह काही अश्लील मेसेज देखील यायला सुरुवात झाली. सागर यांना असे का होतेय याचा काही उलगडा होत नव्हता मात्र काही कालावधीत झाला प्रकार त्यांच्या लक्षात यायला सुरुवात झाली. सागर यांनी काही नंबर ब्लॉक देखील केले मात्र मग व्हाट्सआपला मेसेज, व्हिडीओ कॉल यायला सुरुवात झाली. वैतागून काही काळ सागर यांनी मोबाईल बंद देखील केला मात्र परत फोन सुरु केला की परत तेच फोन पुन्हा सुरु झाले.

सागर हे सरकारी नोकरीत असून त्यांचा नंबर हा सरकारी कामासाठी इतरत्र लोकांना दिलेला आहे . सागर कामाच्या ठिकाणीही फोन येणं सुरूच होतं.शेवटी सागर यांनी तो नंबर कायमचा बंद करून टाकला सुशांतसिह आत्महत्येचा तपास सुरु असताना हिंदी उतावीळ आणि बेजबाबदार मीडियाच्या कारभाराचा सागर यांना फटका बसला. हा नंबर बंद ठेवल्याने काम करताना देखील सागर यांना अडचणी येत आहेत.


शेअर करा