संतापजनक..मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलाची हत्या : कुठे घडलाय प्रकार ?

शेअर करा

देशात एक धक्कादायक घटना हैदराबाद इथे उघडकीस आली असून मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या एका हिंदू मुलाची भर रस्त्यात गाठून हत्या करण्यात आलेली आहे. हैदराबादच्या सरुरुनगरमध्ये ही घटना घडलेली असून नागराजू असे मयत पतीचे नाव आहे तर त्याचा मेहुणा असलेल्या व्यक्तीने हा अमानुष प्रकार केलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नागराजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मपरपल्ली गावातील रहिवासी होता तर सुल्ताना त्याच्या शेजारी असलेल्या घानापूर गावात राहत होती. दोघेही सात वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते मात्र या लग्नाला सुल्तानाच्या घरातून विरोध होता. चार वर्षांपूर्वी 31 जानेवारीला पळून जाऊन नागराजू आणि सुल्ताना यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर त्याने सुल्तानाचे नाव बदलून पल्लवी असे ठेवले होते त्यामुळे सुलताना हिच्या कुटुंबियांकडून त्याचा जीविताला धोका होता.

नागराजू एका कार शोरुममध्ये सेल्स मन म्हणून काम करीत होता.हल्ल्याच्या वेळी सुल्ताना घटनास्थळी उपस्थित होती. तिने आरोप केला आहे की, तिचा भाऊ आणि त्याच्या काही मित्रांनी हा हल्ला केला. सुल्तानाचा भाऊ आणि भावोजीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मृत नागराजू आणि त्याची पत्नी सुल्ताना हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी या वर्षी जानेवारीत लग्न केले होते.या लग्नामुळे सुल्तानाचा भाऊ नाराज होता, त्यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

नागराजूवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आणि मारहाण केल्यावर त्यानंतर चाकूने भोकसून त्याची हत्या करण्यात आली. नागराजू त्याची पत्नी सुल्तानाला सोबत घेऊन बाईकवरुन सरुरनगरकडे चालला होता. त्यावेळी तहसीलदार कार्यालयाजवळ दोघांनी लोखंडी रॉड आणि चाकुने नागराजूवर हल्ला केला. नागराजूच्या पत्नीसमोरच त्याची हत्या करण्यात आली. नागराजूच्या परिवाराने सुल्तानाच्या कुटुंबीयांविरोधात हत्येचा आरोप केला आहे तर हिंदू संघटनांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, पोलीस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे.

तेलगंणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. हत्या करणारे परिवारातील सदस्यच होते का, कोणत्या धार्मिक गटाने आरोपींना असे करण्याचा सल्ला दिला होता का, त्यांना कुणी आर्थिक मदतीचे आमिष दाखवले होते का, अशा सर्व एंग्ल्सनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.


शेअर करा