लग्नाला दोन वर्षे झाली तरी बायको जवळ येऊ देईना शेवटी पतीने घेतला ‘ असा काही ‘ निर्णय की …

  • by

लग्न होऊन जवळपास दोन वर्षे होत आली तरी बायको शारीरिक संबंध ठेवण्यास सातत्याने नकार द्यायची कारण विचारले तर काही बोलत नसायची मात्र विवाहात शारीरिक सुख लाभत नसल्याने त्यांच्यात भांडणे होऊ लागली. काही कालावधीत ह्या भांडणाची परिणीती बायको तिच्या घरी निघून जाण्यात झाली मात्र त्यानंतर एकाकी पडलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद येथील शाहेरकोटदा पोलीस ठाण्याच्या हददीत घडली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सुरेंद्रसिंह ( पती ) हा रेल्वेमध्ये काम करत होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याचे गीतासोबत लग्न झाले होते. त्याआधी २०१६ मध्ये सुरेंद्रसिंहचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. तर दुसरीकडे गीता देखील घटस्फोटित होती. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी काही कालावधीत लग्न केले मात्र लग्नाला दोन वर्षे झाली पत्नी सेक्स करू देत नव्हती अशी माहिती मयत पतीच्या आईने दिली असून मयताची पत्नी गीता हिच्या विरोधात पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शाहेरकोटदा पोलीस ठाण्यात सुरेंद्रसिंहच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार,एकदा मी मुलाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी मुलगा आणि सून दोघेही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले होते. याबाबत मी मुलाला विचारले असता आमच्यात अजून कोणतेही शारिरीक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत असे मुलाने सांगितले. गीता ही शारिरिक संबंधांना नकार देत असल्याचे त्याने सांगितले. तिला त्याच्यासोबत कोणतेही संबंध त्याच्यासोबत ठेवायचे नव्हते, असा आरोप सुरेंद्रसिंहच्या आईने तक्रारीत केला आहे.

तिच्या अशा वागण्याने माझा मुलगा मानसिक तणावात राहू लागला त्यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडणे सुरु झाली . पुढे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यानंतर गीता आपल्या पालकांच्या घरी निघून गेली होती. सुरेंद्रसिंहने देखील तिच्याशी संपर्क तोडला मात्र तो डिप्रेशनमध्ये गेला असे त्याच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. २७ जुलै रोजी आमच्या घरातील लोक एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले असताना सुरेंद्रसिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली असे आईने तक्रारीत म्हटले असून सुरेंद्रसिंह यांच्या आईने ६ ऑगस्ट रोजी गीताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.