नगर ब्रेकिंग..हॉटेल व्यावसायिकाच्या डोक्याला लावला ‘ गावठी कट्टा ‘ अन ..

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळ राहाता तालुक्यातील वाकडी येथे एका हॉटेलमध्ये घडलेली आहे. हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या चार आरोपींनी गावठी कट्टातुन गोळीबार केला आणि हॉटेल चालकाच्या डोक्याला कट्ट्याने मारहाण करत तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हॉटेलचालक विजय हरिभाऊ चोळके ( वय 35 राहणार चोळके वाडी तालुका राहता ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून रावसाहेब वायदंडे, रमेश तानाजी वायदंडे, गोरक्षनाथ भुसाळ, दत्तात्रय जगताप ( सर्वजण राहणार राहता तालुका ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी पाच तारखेला दुपारी चारच्या सुमारास गणेश नगर- वाकडी रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवण लवकर दिले नाही म्हणून तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालत यांनी शिवीगाळ केली आणि चोळके यांच्या डोक्याला गावठी कट्टा लावत त्यांना जखमी केले तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणि हातातील अंगठी देखील त्यांनी काढून घेतली आणि त्यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले.

श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव देत घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींची धरपकड सुरू केली आणि संध्याकाळपर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे, संजय निकम, हवालदार राजेंद्र लवांडे, मोहन शिंदे, अशोक डांगळे, प्रशांत रणनवरे यांचा समावेश होता