तुझी आई आणि मी जे करतो ते माझ्यासोबत कर तुला मज्जा येईल : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

आईचे विवाहबाह्य संबंध असल्याचे मुलीला माहित होते. मुलीच्या आईचा प्रियकर वारंवार तिच्या आईला भेटायला घरी येत असे मात्र पुढे पुढे त्याची नजर त्या अल्पवयीन मुलीवर देखील पडली मात्र आईने देखील अशा वेळी प्रियकराचीच बाजू घेतल्याने मुलीला त्रास देणे सुरु झाले. तिच्याशी अश्शील वर्तन तो प्रियकर करून लागला शेवटी त्रास असह्य झाल्याने मुलीने हा प्रकार आपल्या आत्याला सांगितला आणि पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथे ही धक्कादायक घटना घडली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, शिरूर इथे पीडित मुलीची आई राहायला आहे. मुलीच्या आईचा प्रियकर विजय पाटील हा कायम घरी यायचा. तो आल्यानंतर आई नि तो घरात दारू पिऊन अश्लील कृत्य करत असत. मुलगी यावेळी तिकडे दुर्लक्ष करायची मात्र पुढे पुढे त्याने पीडित मुलीसोबत देखील अश्शील चाळे सुरु केले. विजय पाटील हा पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवचा तसंच ‘तुझी आई आणि मी जे करतो ते माझ्यासोबत कर… तुला मज्जा येईल,’ असं म्हणत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असे मुलीचे म्हणणे आहे .

मुलगी प्रतिसाद देत नसल्याने घरात जे चाललंय हे जर कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी देखील तो देत होता असे मुलीचे म्हणणे आहे . आईला सांगावे तर आई मुलीला, आता विजय पाटील हेच तुझे वडील आहेत, त्यांना तू पप्पा म्हणत जा आणि ते तुला जसे म्हणतात तू तसे करत जा, असं सांगत असे. याबाबत आई व आईच्या प्रियकराकडून होणारे अत्याचार असह्य होऊ लागल्याने पीडितेने तिच्या आत्याला याबाबत सर्व हकीगत सांगितली.

मुलीच्या आत्याला हा प्रकार ऐकून धक्काच बसला. मुलीच्या आईशी बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर आत्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिरूर पोलिसांनी पीडित अल्पवयीन युवतीची आई व तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील रा. खारमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करत आहे.


शेअर करा