बायकोसोबत भांडण झाल्यावर 112 नंबर वर केले तब्बल ‘ इतके ‘ कॉल, पोलीसही म्हणाले ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेली असून 112 नंबर वर पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर सतत फेक कॉल करत एका पोलिसांना त्रास देणाऱ्या एका इसमावर रामनगर पोलिसांनी कलम 182 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. मनोज बबन आमटे ( वय 35 राहणार तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांना नागरिकांची मदत मिळावी म्हणून 112 क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे या नंबरवर फोन केल्यास अवघ्या काही मिनिटात पोलीस ठाण्याचे कर्मचारी मदत करतात मात्र राजुरा तालुक्यातील मनोज आमटे हा 112 क्रमांकावर फोन करून वारंवार पोलिसांना त्रास देत होता आणि त्यांच्या सोबत अर्वाच्य भाषेत देखील बोलत होता त्यामुळे त्यांच्याविरोधात नोडल अधिकारी राजेश डाकेवाड यांनी तक्रार केली.

मनोज याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता त्याबाबत त्याने 112 वर तक्रार दाखल केली आणि पोलिसांची पथके तीन ते चार वेळा त्याच्या घरी देखील गेली. त्याला आणि त्याच्या बायकोला समज दिली मात्र तरीदेखील तो सतत कॉल करून पोलिसांना त्रास देत होता. 112 नंबर वर त्यांनी तब्बल 12 वेळा कॉल करून पोलिसांशी अर्वाच्च भाषेत बोलला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


शेअर करा