नगर ब्रेकिंग..सोळाव्या वर्षाआधीच मुलगी सहा महिन्यांची गर्भवती , पीडिता म्हणतेय की ..

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील राहुरीनजीक एका वस्तीत समोर आलेली असून 14 वर्षीय मुलाने साडेपंधरा वर्षाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे. संशयित आरोपी मुलगा हा पीडित मुलीच्या मामाचा मुलगा असून त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचा मामा हे शेजारी शेजारी राहत असून 2021 मध्ये दिवाळीनंतर चार-पाच दिवसांनी घरी कोणीही नसताना पीडित मुलीला मामाने मामाच्या मुलाने त्याच्या घरात बोलावले आणि तिची इच्छा नसताना तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. काही कालावधीनंतर हा प्रकार नेहमीचा झाला आणि ‘ झालेला प्रकार जर तू कुणाला सांगितला तर तुला ठार मारेन ‘ अशी देखील त्याने धमकी दिली.

काही दिवसानंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती तब्बल सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आल्यावर आई-वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली त्यानंतर तिने आपल्या सोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार आई-वडिलांना सांगितला आणि त्यानंतर सदर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात अत्याचार करणारा मामाचा मुलगा याच्या विरोधात कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करत आहेत.