प्रेमप्रकरणातून मारहाण करून चक्क शौचालयात कोंडले , बाहेर काढले तेव्हा ..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एका तरुणीसोबतचे प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या भावाने त्याच्या मित्रांना सोबत घेत शौचालयात कोंडून लाकडी बांबू आणि पट्ट्याने मारहाण केलेली आहे. सदर घटनेचा त्याने व्हिडिओ देखील बनवलेला असून तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रेयसीच्या भावासह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गोवंडी परिसरात राहणाऱ्या साहिल ( वय 20 ) नावाच्या एका तरुणाची चार महिन्यापूर्वी एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. काही कालावधीत त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि याबाबत तरुणीच्या भावाला माहिती समजली. पाच मे रोजी साहिल हा प्रेयसीसोबत बोलत असताना तिच्या भावाने पाहिले आणि त्याला शिवाजीनगर परिसरात भेटण्यासाठी बोलावले.

साहिल तेथे पोहोचला असता आधीपासूनच दबा धरून बसलेल्या प्रेयसीच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी त्याला बंद शौचालयात नेले आणि लाथाबुक्क्यांनी सह बेल्टने जोरदार मारहाण केली आणि याचा त्यांनी एक व्हिडिओदेखील बनवला आणि सोशल मीडियावर तो शेअर केला. त्यानंतर या तरुणाला तिथेच कोंडून ठेवले. संध्याकाळी त्याची प्रकृती बिघडू लागली म्हणून त्याला बाहेर काढून सोडून दिले तसेच कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारेल अशी देखील धमकी दिली मात्र या तरुणाने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.