लालूबाईला म्हणाला ‘ रानात येते का ? ‘ , नवऱ्यासोबत गेली अन त्यानंतर ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलेली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वतीने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नजीक पारा येथे ही घटना घडलेली असून घटनेनंतर आरोपी फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार सखुबाई शिंदे यांची मुलगी लालूबाई ( वय 28 ) हिचा विवाह 13 वर्षांपूर्वी कळंब तालुक्यातील बापू मच्छिंद्र काळे याच्यासोबत झालेला होता. लग्नानंतर त्यांना तीन मुले देखील झाली मात्र लालूबाई हिचा नवरा बापू हा सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत दारू पिऊन तिला मारहाण करत असायचा.

त्याच्या या त्रासाला कंटाळून लालूबाई अखेर माहेरी आईकडे पारा येथे राहण्यास आली होती त्यानंतर बायकोशिवाय करमत नसल्याने बापू हादेखील आठ दिवसांपासून सासुरवाडीला येऊन राहत होता. 6 मे रोजी त्याने पत्नीला कपडे घेण्यासाठी चल असा आग्रह केला मात्र ती त्याच्या सोबत यायला तयार झाली नाही म्हणून त्याने तिला पारा शिवारातील गायरानात नेले आणि तिच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहर्‍यावर दगड घालून तिचा खून केला. सदर घटना उघडकीला आल्यानंतर लालूबाई हिची आई सखुबाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


शेअर करा