‘ मुले जन्माला घाला अन लाखो मिळवा ‘, ‘ असल्या ‘ भन्नाट ऑफर्स की तुम्हीही ..

शेअर करा

भारतामध्ये वाढती लोकसंख्या मोठी समस्या झालेली असून चीनमध्ये मात्र वृद्ध व्यक्तींची संख्या वाढत चाललेली आहे. काही वर्षांपूर्वी एका दांपत्यास एकच एकच मूल या प्रकाराने चीनमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या वाढलेली असून तिसर्‍या मुलाला जन्म देण्यासाठी चीनमध्ये प्रोत्साहन देण्यात येत आहे मात्र चिनी नागरिक याबद्दल उदासीन असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे मुलींचे देखील प्रमाण चीनमध्ये अत्यंत कमी असून वंशवाढीसाठी चक्क पाकिस्तानमधून मुलींची तस्करी होत असल्याचे देखील प्रकार समोर आलेले आहेत. तिसरे अपत्य जन्माला घालण्यासाठी सरकार आणि विविध कंपन्यांकडून आता लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत आहेत.

बीजिंग टेक्नॉलॉजी या कंपनीने कर्मचाऱ्यांनी तिसरे बाळ जन्माला घातल्यानंतर जवळपास त्यांना भारतीय रुपया अकरा लाखांचा बोनस जाहीर केलेला आहे तर जर महिला कर्मचारी तिसऱ्या मुलाला जन्म देणार असेल तर तिला पूर्ण वर्षासाठी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर पुरुष कर्मचार्‍यांना देखील नऊ महिन्यांची सुट्टी देण्यात येणार आहे अर्थातच ही सुट्टी पगारी असणार आहे.

कर्मचाऱ्याने दुसरे बाळ जन्माला घातले तर भारतीय रुपयात सात लाख रुपये बोनस म्हणून देण्यात येणार असून पहिले बाळ जन्माला घातले तर भारतीय रुपयात साडेतीन लाख रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी भारतात ‘ हम दो हमारे दो ‘ असा नारा देण्यात आला होता.

चीनमध्ये याच्या विपरीत एका दांपत्यासाठी एकच मुल असा कायदा करण्यात आला होता त्यामुळे चीनची लोकसंख्या कमी झाली मात्र त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आणि वृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याने चीनची म्हाताऱ्या व्यक्तींचा देश अशी देखील ओळख होऊ लागली त्यावर पर्याय म्हणून आता चीनने हे नवीन धोरण अवलंबिले आहे.


शेअर करा