‘ भाजपवर रोज बेडरपणे हल्ले केले पाहिजेत ‘, शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल

‘ भाजपवर रोज बेडरपणे हल्ले केले पाहिजे. परिणामाची पर्वा न करता मी स्वतःदेखील रोज सकाळी बोलतो कारण माझा नाईलाज आहे. मी सकाळी बोललो नाही तर दिवसभर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही ‘ असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबई येथे सांगितले आहे.

‘ सोशल मीडिया कसा हाताळावा ‘ या युवा सेनेच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘ शिवसेनेकडे माध्यमांवर बोलण्यासाठी सध्या युवा नेतृत्व नाही. मी जर बोललो नाही तर दिवसभरात सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील शिवसेना दिसणार नाही.

शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती मात्र आता वडापाववर युद्ध होणार नाही कारण महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. महाराष्ट्र आपल्या हातात आहे आणि हे राज्य आपण भाजपकडून खेचून घेतले आहे त्यामुळे बेडरपणे भाजपच्या टीकेला उत्तर द्या ‘, असे देखील मार्गदर्शन संजय राऊत यांनी केले आहे.