व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य लिमिट वाढणार , तब्बल ‘ इतके ‘ लोक राहणार एकाच ग्रुपमध्ये

सध्या प्रत्येक स्मार्टफोन मोबाईलमध्ये व्हाट्सअप असतेच आणि व्हाट्सअपच्या विविध ग्रुपच्या माध्यमातून अनेकजण आपल्या मित्र परिवाराच्या संपर्कात राहत असतात मात्र मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार असणाऱ्या नागरिकांसाठी व्हाट्सअपचे ग्रुपचे लिमिट हे 256 असल्याने अनेक अडचणी येत असून आता व्हाट्सअपने याचा विचार करत एक गुड न्यूज आणलेली आहे. व्हाट्सअप आता नवीन फीचर घेऊन येणार असून एका ग्रुपमध्ये 512 लोकांना सहभागी करून घेता येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपची सध्याची मर्यादाही 256 सदस्य सदस्यांची असून ही आता काही दिवसात दुप्पट होणार आहे तसेच व्हाट्सअपवरून दोन जीबी आकाराची फाइल देखील पाठवता येणार आहे. सदर नवीन फीचर्स आय ओ एस आणि अँड्रॉइड या दोन्ही फोनवर उपलब्ध राहणार असून व्हाट्सअपचे नवीन व्हर्जन काही कालावधीतच नागरिकांना पाहायला मिळणार आहे. टेलिग्रामला स्पर्धा देण्याच्या उद्देशाने हे फीचर आणण्यात आल्याची चर्चा असून नागरिक त्याला कसा प्रतिसाद देतात हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.