‘ तुमचे भांडण सोडवून देतो ‘ म्हणत पोलिसाचे ‘ नको ते ‘ वर्तन , महिला म्हणतेय की ?

शेअर करा

महाराष्ट्रात पोलीस दलाला काळिमा फासणारी एक घटना मुंबईतील मीरारोड येथे उघडकीला आली असून भाईंदर पूर्व परिसरात नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 27 वर्षीय तक्रारदार महिलेवर पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस हवालदार बाळासाहेब ढोले ( वय 28 ) याला अटक करण्यात आलेली असून 10 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घरगुती भांडणातून पोलिसात तक्रार करण्यासाठी ही महिला नवघर पोलीस ठाण्यात गेली होती तेव्हा तिची ओळख बाळासाहेब ढोले याच्यासोबत झाली त्यानंतर ‘ तुमचे भांडण सोडून देतो ‘ असे म्हणून तो तिला धारावी मंदिर येथे घेऊन गेला त्यानंतर त्या महिलेला घरच्यांशी ओळख करून देण्याचा बहाणा करत भाईंदर पूर्व येथे घेऊन जात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने नवघर पोलिस ठाणे गाठले. संशय बाळासाहेब ढोले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्यात हजर असलेल्या हवालदाराला तात्काळ अटक करण्यात आली आणि त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.


शेअर करा