अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून बहिणीच्या मारली मुस्काडात, श्रीरामपूरची घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना श्रीरामपूर शहरात उघडकीला आली असून श्रीरामपूर येथील एका महाविद्यालयाच्या आत असलेल्या गेटच्या जवळ सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थिनीने याबाबत बहिणीला सांगितले त्यावेळी अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीच्या बहिणीच्या देखील तोंडावर चापट मारली.

पीडित मुलीने आपल्या बहिणीच्या सोबत सरळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली आहे. सदर आरोपी हा अल्पवयीन असून श्रीरामपूर येथील सुभेदार वस्ती येथे राहतो. त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी अल्पवयीन असल्याने त्या दृष्टीने विचार करून पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा