हळदीला येताना गाडीत ‘ स्फोटके अन दोन फुटांची वात ‘ , दोन जण ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आलेली असून मुरबाड तालुक्यातील वाघाची वाडी येथे अरुण पादीर यांच्या मुलाच्या हळदी समारंभाला निमंत्रण नसताना आलेले पाहुणे आपल्या गाडीत स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ घेऊन मंगल कार्यालय इथे दाखल झाले होते. आठ मे रोजी ही घटना घडली असून नागरिकांनी प्रमोद आणि विलास शिंगे यांना पकडून गाडीसह पोलिसांच्या स्वाधीन केले आहे तर इतर दोन जण फरार झालेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, वाघाचीवाडी इथे अरुण पादीर यांच्या मुलाचा आठ मे रोजी हळदी समारंभ होता त्यावेळी तिथे आलेले प्रमोद आणि विलास शिंगे सोबत इतर दोन जण यांच्या हालचालीवरून ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी गाडीची तपासणी केली असता एका कारमध्ये स्फोटके आणि त्याला दोन फुटांची वात तसेच ज्वलनशील पदार्थ असल्याचे दिसून आले त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

ग्रामस्थांनी या चौघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी दोन जणांनी पकडणाऱ्या व्यक्तींच्या हाताला चावा घेतला आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी प्रमोद आणि विलास यांना अटक केली असून ते हा प्रकार का करत होते याचा तपास सुरू आहे .


शेअर करा