नेवासे तालुक्यात भाजपला गळती, शंकरराव गडाख याचा ‘ मास्टरस्ट्रोक ‘ कायम..

नेवासे तालुक्यात भाजपला लागलेली गळती कमी होण्याचे काही नाव घेताना दिसून घेत नाही. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत नेवासे बुद्रुक जोगेश्वरी आखाडा येथील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून बाळासाहेब मुरकुटे यांची घसरत असलेली राजकारणाची पातळी हे कारण सांगत अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत.

नेवासे बुद्रुक परिसरात जोगेश्वरी आखाडा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि आणि इतर पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असून अखेर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांनी चांगला पर्याय म्हणून मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

भाजप कार्यकर्ते सुभाष दळवी, धनंजय माळवदे शिवा गावडे, चंद्रकांत पिंपळे, दादा गावडे, सुनील गावडे, संतोष जाधव, मधुकर कोकणे, नामदेव पिंपळे, राजू थावरे यांच्यासह 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे