दोन जिल्ह्यात सूत्रे हलवून ‘ मुलगी ‘ कुटुंबाच्या ताब्यात दिली तरीही.. , श्रीरामपूरमध्ये दुर्दैवी प्रकार

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे नागरिकांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. सरकारी पातळीवर काम करणाऱ्या लोकांना याच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते अशीच एक घटना श्रीरामपूर येथे समोर आली असून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारला.

तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्यात आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी सुरवाडे यांना धक्काबुक्की करत जखमी केले. दुर्दैवाने मुलीचा शोध लागल्यानंतर हा प्रकार घडलेला असून सदर प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एका मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा 13 फेब्रुवारी रोजी शहर पोलिसात नोंदविण्यात आलेला होता त्याचा तपास सुरवाडे यांनी केला आणि मुलीच्या शोधासाठी सुरवाडे, पोलीस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह 10 मे रोजी पुण्याला दाखल झाले. तेथून ही मुलगी पुन्हा शिर्डीला गेल्याची माहिती समजल्यावर शिर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी आपल्या पथकासह शिर्डीत तिचा शोध घेतला आणि अखेर ती साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक चार जवळ आढळून आली त्यानंतर तिला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणले होते.

12 तारखेला दुपारी मुलीचा जबाब नोंद होत असताना वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी मुलीचे नातेवाईक कक्षांमध्ये आले आणि त्यांनी मुलीची तपासणी का करत नाहीत ? असा खडा सवाल करत असा सवाल करत उपनिरीक्षक सुरवाडे यांना शिवीगाळ करायला सुरु केले त्यानंतर तिघांनी सुरवाडे यांना मारहाण करत जखमी केले.


शेअर करा