‘ महिला असली तरी तू छपरीच ‘, विकृत केतकीला जंगी चोप देण्याचा इशारा

शेअर करा

चित्रपटसृष्टीत दुर्लक्षिलेल्या अनेक अभिनेत्री आपल्या वायफळ पोस्ट टाकून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात, केतकी चितळे ही त्यापैकीच एक. केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला कालपासुन सोशल मीडियावर चांगलेच फैलावर घेतले होते. वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकील असलेले नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहलेली एक विकृत पोस्ट केतकी हिने तिच्या फेसबुकवर शेअर केली आहे . सदर पोस्टवर हजारो लोकांनी या पोस्टवर कमेंट केल्या असून केतकीच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या शरद पवारांविषयी असे बोलल्याबद्दल केतकीला चांगलेच फैलावर घेतले आहे .राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती मात्र त्या कवितेचा अर्धवट संदर्भ जोडून भाजप समर्थित लोकांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता, त्यातूनच ही विकृत कविता लिहलेली दिसून येत आहे.

सदर प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केतकी चितळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला असून ‘ तिचा फोटो शेअर करत महिला असली तरी तू छपरीच आहेस. तुला चपलेने शंभर फटके मारून एक असे मोजले पाहिजे ‘ असेदेखील लिहलेले आहे . सोबतच #सडकी #केतकी #चितळे असे हॅशटॅग वापरत तुला लवकरच चोप देण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहे रुपाली पाटील यांची पोस्ट ?

चि चि चवताळीस बाई तू
महिला असली तरी छपरीच तु,
संस्कार नसलेली केतकी,
इतकीशी कशी चवताळीस
हरामखोर विकृती,मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे.
कशात ना मशात केतकीबाई तमाशात ,
लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप
#सडकी #केतकी #चितळे


शेअर करा