हृदयद्रावक..ट्रान्सप्लांटला पैसे नाहीत तन्वीला घरी आणले , नागरिकांना आवाहन

शेअर करा

महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना समोर आलेली असून जन्मजात हृदयात असलेले छिद्र काही वर्षांनी बुजेल अशा डॉक्टरांच्या आशेवर असलेल्या माता-पित्यांना मुलगी नऊ वर्षाची झाल्यानंतर मोठा आघात बसलेला आहे. मुलीचे हृदय आणि फुप्फुसे निकामी झालेले असून ट्रान्सप्लांट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुलीचे वडील हे एसटीमध्ये सात महिन्यांपासून बिन पगारी असून यासाठी खर्च तब्बल ३६ लाख आहे. एसटी संपामुळे आधीच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या वडिलांना लेकीच्या हृदयासाठी इतके पैसे उभे करणे शक्य नाही. नांदेड येथील ही हृदयद्रावक कथा असून दानशूर नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

उपलब्ध माहितीनुसार नांदेड आगारात मेकॅनिक असलेले विपिन रमेश बोरले हे संभाजी चौक सिडको येथील रहिवासी असून त्यांना तन्वी नावाची नऊ वर्षांची मुलगी आहे. तनवी दीड महिन्याची असताना तिचे पोट फडफड करत असल्याने डॉक्टरांना दाखवण्यात आले होते त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छोटे छिद्र असून काही वर्षांनी ते बुजेल असे सांगितले होते. डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवून काही वर्षे गेली आणि 21 जानेवारीला तिचा वाढदिवस करण्याचे ठरलेले असताना त्यानंतर मुंबईला जाऊन तपासणी करू असे नियोजन कुटुंबाने केले होते मात्र त्यापूर्वीच तिच्या मेंदूत इन्फेक्शन झाले.

विपीन बोरले यांनी लेकीला घेऊन मुंबईला धाव घेतली आणि डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर तनवीचे हृदय आणि फुप्फुस निकामी झालेले असून ट्रान्सप्लांट करावे लागेल असे सांगितले त्यासाठी तब्बल ३६ लाख रुपये खर्च सांगितलेला असून आधीच खाण्याची भ्रांत असलेल्या बोरले कुटुंबासाठी हा एक मोठा आधार होता. दवाखान्यात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र ट्रान्सप्लांट करण्यासाठी पैसेच नसल्याने हताश होऊन हे कुटुंब पुन्हा नांदेडला आले आहे. दानशूर लोकांनी तनवीच्या उपचारासाठी मदत करावी असे आवाहन तिच्या पालकांनी केले आहे.

मदत पाठवण्यासाठी माहिती
नाव: विपीन रमेश बोरले
बॅंकचे नाव :state bank of India
शाखा : Nanded
Account No: 11266036873
IFSC : SBIN0000433
Account :Saving
किंवा Google pay: 9503578727


शेअर करा