धक्कादायक.. बलात्काराची केस मागे घे म्हणत महिलेच्या मुलीवर पेट्रोल टाकून पेटवले : कुठे घडली घटना ?

शेअर करा

बलात्काराची केस मागे घेत नसल्याने ते दोघे महिलेच्या घरात शिरले आणि तिला ‘बलात्काराची केस मागे घे’ म्हणून धमकी देऊ लागले . ही वादावादी सुरु असताना सदर महिलेची १० वर्षाची मुलगी बाहेर आली. आरोपींनी महिलेच्या दिशेने पेट्रोल फेकले मात्र मुलगी मध्ये उभी असल्याने तिच्या अंगावर पेट्रोल पडले आणि आरोपींनी त्यानंतर काडी पेटवून फेकली यात ती मुलगी भाजून गंभीर जखमी झाली. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वाघुंडे गावाच्या शिवारात ही धक्कादायक घटना १३ ऑगस्टला घडलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा.पळवे, ता.पारनेर ) १३ ऑगस्ट रोजी हे संबंधित महिलेच्या घरी गेले आणि तिला बलात्काराची केस मागे घे म्हणून धमकावू लागले त्यावेळी दहा वर्षाची मुलगी या बाहेर आली आणि त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला. शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाच्या शिवारात माळरानावर संबंधित महिलेचे कुटुंब झोपडीमध्ये राहत असून १३ ऑगस्टला संबंधित महिला व तिची दहा वर्षाची मुलगी आपल्या झोपडीमध्ये जेवण करत होत्या. यावेळी तेथे आरोपी राजाराम तरटे व अमोल तरटे हे दोघे दुचाकीवर आले. त्यानंतर त्यांनी सदर महिलेला ‘तु बलात्काराची केस मागे घे’, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आईला करण्यात येत असलेली शिवीगाळ ऐकून संबंधित महिलेची दहा वर्षाची मुलगी झोपडीच्या बाहेर आली. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल हे महिलेच्या अंगावर फेकले असता, हे पेट्रोल त्या महिलेच्या दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडले. त्यानंतर आरोपीने काडी पेटवून ती मुलीच्या दिशेने फेकली असता मुलीच्या अंगावरील फ्रॉकने पेट घेतला .सदर घटनेमध्ये संबंधित महिलेची दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अहमदनगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत.


शेअर करा