नगर येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून क्लास संपल्यानंतर रस्त्याने घरी जात असताना एका मुलीला ‘ तु मला आवडतेस ‘ असे म्हणत ओढण्यात आले आणि तिचा हात धरून तिला ओढत असताना तिच्यात गावातील एक टेम्पो आला. तो पाहिल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले, त्यानंतर या दोन जणांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नितीन बाळू जपकर व अमोल आजिनाथ होळकर ( दोघेही राहणार नेप्ती ) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे असून फिर्यादी मुलगी ही शिवणकामाच्या क्लासला गेली होती. क्लास संपल्यानंतर ती घरी जात असताना पाठीमागून हे दोघे दुचाकीवर आले आणि तिला थांबवले ‘ तू आम्हाला आवडतेस तुझा मोबाईल नंबर दे ‘ असे अमोल याने तिला म्हटले. तिने नंबर दिल्याने नकार दिला म्हणून आरोपी नितीन याने तिचा हात धरला आणि तो तिला ओढू लागला. हा सर्व प्रकार सुरू असतानाच समोरून तिच्या गावचा एक टेम्पो आला आणि टेम्पो चालक याला पाहिल्यानंतर आरोपींनी धूम ठोकली.
सदर आरोपींनी याआधी देखील मुलीला अशाच पद्धतीने त्रास दिला असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन तिने यांच्या विरोधात फिर्याद दिली असून संशयित आरोपींच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप ढाकणे हे करत असून वृत्त लिहीपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती.