महाराष्ट्र हादरला..दोन बायका घरात अन एक पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळला

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून दोन बायका असलेल्या एका नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलीचा निर्घृणपणे खून केल्याची घटना जालना शहरातील रेल्वेस्थानकाजवळ सोनलनगर भागात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भारती गणेश सातारे ( वय 36) आणि मुलगी वर्षा गणेश सातारे (वय 17) असं मयत मायलेकीचं नाव असून दोघी मायलेकींचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. सदर घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघी मायलेकीचे मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवले . पती गणेश सातारे यानेच आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलाच्या मदतीने केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे.

मयत महिलेचा पती गणेश सातारे यास दोन पत्नी असून दोघी एकाच घरात राहत होत्या. एक पत्नी वरच्या मजल्यावर आणि मयत भारती या तळमजल्यावर राहात होती. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून याप्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दोघी मायलेकीचा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याची संशय असून सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मयत भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत भारती सातारे आणि मुलगी वर्षा सातारे यांना चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती गणेश उर्फ संजू सातारे, सवत सीमा सातारे, सवतीचा 16 वर्षाचा मुलगा या तीन जणांनी बेदम मारहाण केली होती. मयत भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती मात्र तिचेही याआधी एक लग्न झालेले होते.

पहिल्या पतीपासून तिला दोन मुली झालेल्या असून एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी मयत वर्षा ही होती. मयत भारती हिचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला होता. मयत भारती यांना गणेश सातारे याच्यापासून झालेला एक मुलगा असून तो 8 वर्षाचा आहे. याप्रकरणी आरोपी गणेश उर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी सीमा सातारे आणि १६ वर्षाचा मुलगा, आशा तीन जणांविरुद्ध भादंवि. 302, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.


शेअर करा