सोसायटीतील महिलांच्या ‘ तसल्या ‘ व्हिडिओसाठी पाईपवर चढून शूटिंग करणारा विकृत धरला

शेअर करा

कोणाच्या डोक्यातील विकृती कशी बाहेर येऊ शकेल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना दिल्लीच्या जवळील ग्रेटर नोएडाच्या एका हाउसिंग सोसायटीमध्ये उघडकीस आली असून सोसायटीत राहणाऱ्या महिलांचं चोरून चित्रीकरण करणाऱ्या एका व्यक्तीला रहिवाशांनी पकडलं आहे. महिला आंघोळीसाठी गेल्यानंतर हा तरुण पाईपच्या सहाय्याने मजले चढून जायचा आणि यानंतर मोबाईलच्या आधारे चित्रीकरण करत होता. अखेर 20 दिवसांनंतर आरोपी पकडला गेला आहे.

आरोपीचे गुन्हेगारी कृत्य गेल्या महिन्यात बिल्डिंगमधील सीसीटीव्हीत पहिल्यांदा कैद झालं त्यानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रार करूनही पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही. शूटिंग झालं की तो चकमा देऊन फरार होत असे. स्थानिकांनी मात्र यासंबंधी मोहीमच राबवली आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल.

ग्रेटर नोएडा येथील अजनारा ले गार्डन हाऊसिंग सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून एप्रिलमधील घटनेनंतर रहिवाशांनी सोशल मीडिया मोहीम सुरू केली आणि त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं. सोसायटीच्या एका रहिवाशाने आरोपीला बाजारात फिरताना पाहिले तेव्हा हा तोच असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी आरोपीला पकडले.


शेअर करा