चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ शहरात कडक लॉकडाऊनची होणार सुरुवात : वाचा पूर्ण बातमी

शेअर करा

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे .सोमवार सकाळपासून जिल्ह्यातील घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून सोमवारी सकाळपासून लॉकडाऊनच्या नियमाची अंमलबजावणी सुरु होईल.

बल्लारपूर, गोंडपिंपरी व घुग्घुस ही चंद्रपुर जिल्हयातील तीन प्रमुख शहर असून या शहरांत मोठ्या प्रमाणात बाधिताची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस ग्रामपंचायत हद्दीत रविवार १६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व किराणा दुकानं, सर्व किरकोळ व घाऊक विक्रेते व इतर व्यवसाय करणारी दुकाने व अन्य आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केले.

बल्लारपूर शहरात सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर -बामणी बंद राहणार आहे तर गोंडपिंपरी शहरात करोनाने शिरकाव केला असून खबरदारी म्हणून १६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत या शहरात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले


शेअर करा