माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे पण.. , रोहित पवार काय म्हणाले ?

शेअर करा

अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सर्व सामान्य जनतेची कामे अडवणूक न होता झाली पाहिजेत त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागते. त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय सर्वांगीण विकास करता येत नसतो माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे मात्र दबाव आदरयुक्त आहे हे विरोधकांना माहीत नसावे असे प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.

काही दिवसापूर्वी विरोधकांनी रोहित पवार यांचा अधिकार्‍यांवर दबाव असल्याचा आरोप केला होता त्या टीकेचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. जामखेड येथील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाच्या भूमिपूजन सोहळावेळी बोलताना ते म्हटले की, ‘ कर्जत जामखेड मतदार संघात विकास कामे करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्रिमंडळात मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. यातून वीज रस्ते पाणी या कामाबरोबरच सर्वसामान्य जनतेपर्यंत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना पोहोचण्यास माझा प्रथम प्रयत्न असतो .

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मंत्री उपस्थित राहून हा भव्य दिव्य सोहळा दिवसभर साजरा करणार आहेत. त्यावेळी रामराव ढोक महाराजांचे कीर्तन देखील होणार आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले.


शेअर करा