स्वतःच्याच मुलीच्या खुनातील आरोपी इंद्राणी मुखर्जी बाहेर , काय आहे पूर्ण प्रकरण ?

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या शीना बोरा हत्याकांडात पाच महिन्यापूर्वी शीना बोरा ही जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी ही अखेर साडे सहा वर्षांनी कारागृहाच्या बाहेर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय सत्र न्यायालय यांनी वेगवेगळ्या स्वरूपात तिने केलेले सात अर्ज फेटाळले होते.

मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर या प्रकरणाला तोंड फुटले होते. 25 ऑगस्ट 2015 रोजी मुलगी शीना बोरा हिच्या हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जी हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या त्यानंतर तिची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

इंद्राणीचा तिसरा पती असलेला पीटर मुखर्जी याला शीना ही आपली बहीण असल्याचे इंद्राणी हिने सांगितले होते त्यानंतर शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल यांच्यातही जवळीक निर्माण झाली होती. 2012 साली अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एका प्रकरणात अटक झालेल्या आरोपीकडून सदर प्रकरणी तपासादरम्यान भाष्य झाले आणि या प्रकरणाला तोंड फुटले होते.

काय आहे प्रकरण ?

२०१५ ला पेणच्या जंगलात एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची फॉरेन्सिंक चाचणी केली असता हा मृतदेह शीना बोराचा असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं मात्र ही हत्या २०१२ लाच झाली होती. पोलिसांनी सर्वप्रथम इंद्राणीसह तिच्या गाडीचा चालक आणि आणखी काही जणांना अटक केली होती. इंद्राणीने मुखर्जीने आपल्या मुलीचा दुसऱ्या पतीच्या मदतीने खून केला होता.

शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी होती. या हत्येच्या कटात तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि वाहनचालक शामवर राय यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. या हत्येबद्दल माहिती असल्याचा आरोप तिचा तिसऱ्या नवऱ्यावर म्हणजे पीटर मुखर्जीवर ठेवण्यात आला होता मात्र न्यायालयानं पीटरची सुटका यापूर्वीच केली आहे.