‘ तुका म्हणे .. ‘, संत तुकाराम यांचा अपमान करणाऱ्या केतकीच्या विरोधात आता..

अभिनेत्री आणि विकृती याचा संगम असलेली केतकी चितळे हिने समाज माध्यमात ‘ तुका म्हणे ‘ या शब्दाचा वापर करून वादग्रस्त लेखन सोशल मीडियावर पोस्ट केले. देशातील कोणत्याही संतांचा वापर करून अशा स्वरूपाचे लिखाण मनमानी पद्धतीने लिहिलेले लिखाण कोणी प्रसिद्ध करत असेल तर त्यावर कारवाई करण्याची मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानने केलेली आहे.

देहूरोड पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल देण्याबाबत निवेदन देण्यात आले असून यावेळी संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, दिलीप गोसावी, उमेश मोरे हे उपस्थित होते.

नितीन महाराज मोरे यावेळी म्हणाले की, ‘ संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहेत. तुका म्हणे ही तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरीच आहे. वारकरी संप्रदाय हा स्त्रियांचा सन्मान करतो मात्र अशाप्रकारे राजकीय टीकाटिप्पणी करण्यासाठी कोणतीही संस्था किंवा त्यांच्या साहित्याचा आधार घेण्यात येऊ नये आणि संतांचे विडंबन देखील करू नये. माणसाने माणसासारखे वागावे त्याचा अंत पाहू नये असेही ते म्हणाले.

संत तुकाराम महाराजांनी वाईट प्रथा चालीरीती अंधश्रद्धा यावर अभंगाच्या माध्यमातून अपप्रवृत्तींवर आघात केलेला आहे मात्र हे करताना त्यांनी प्रमाणही दिलेले आहे. राजकीय टीका करण्याबाबत काही हरकत नाही मात्र संतांच्या नावाचा आधार घेऊन राजकीय अशा स्वरूपाचे मनमानी पद्धतीने स्वतः जोडलेली टीका करू नये. शासनाने अशा अपप्रवृत्तींवर कडक कारवाई करावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे व विश्वस्त अजीत महाराज मोरे हे यावेळी उपस्थित होते.