केतकी चितळेला ‘ पुन्हा ‘ पोलीस कोठडी, जुने प्रकरण आले बाहेर

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून त्यातच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली आहे.केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते.

मुंबईसह राज्यातील कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीडमधील आंबेजोगई, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंचवड पारनेरमध्येही केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

एका विशिष्ट वर्गाकडून सातत्याने केतकी हीच पाठराखण देखील केली जात आहे.केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात ‘ फुकट मुंबईत दर्शनाला येतात ‘ अशी पोस्ट केली होती. सदर पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

केतकीला पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि एसएमएसच्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.पवारांसंबंधित आक्षेपार्ह पोस्ट केतकीला कोणी पाठवली याचा शोध घेतल्यास यामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे समजण्याची शक्यता आहे.