नगर ब्रेकिंग..’ विकृत ‘ अभिषेक गव्हाणेला कोण पोरगी देईना , बाप म्हणतोय ‘ त्याच्यासोबत आमच्याही .. ‘

Photo Credit : Facebook

नगर शहरात शिलाविहार परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरासमोर उभे राहून महिलेचा पती घरी नसताना जागेच्या वादातून अश्लील शिवीगाळ करणारा संशयित आरोपी अभिषेक तुकाराम गव्हाणे (वय 35, प्लॉट ४, बिजली सहकारी सोसायटी , शिलाविहार, सावेडी, नगर ) हा अविवाहित असल्याचे समोर आले आहे. अभिषेक याचा बाप तुकाराम गेल्या दहा वर्षांपासून त्याच्यासाठी मुलगी शोधत आहे. तुकाराम गव्हाणे याने अनेक जणांना मुलाची माहिती पाठवली होती मात्र नगर शहर आणि एमआयडीसी परिसरातील त्याचा इतिहास लोकांना माहित असल्याने अद्यापपर्यंत त्याला लग्नासाठी मुलगी मिळू शकलेली नाही. तुकाराम गव्हाणे याने ‘ मुलगी गरीब घरातील असेल तरी चालेल पण तिने त्याच्यासोबत आमच्या कुटुंबीयांची ‘ सेवा ‘ करावी अशी देखील मागणी करून पाहिली मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही मुलीच्या बापाने ‘ रिस्क ‘ घेतलेली नाही. शिलाविहार परिसरात राहायला आल्यापासून दोघाही बापलेकांची ‘ नजर ‘ आणि वर्तणूक चांगली नसल्याचे अनेक नागरिक खासगीत बोलून दाखवत आहेत.

काय आहे प्रकरण ?

नगर शहरात शिलाविहार सारख्या उच्चभ्रू परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली होती . परिसरात राहत असलेल्या महिलेच्या घरासमोर उभे राहून तिचा पती घरी नसताना बहात्तर वर्षीय सासूला घराबाहेर बोलवून जागेच्या वादावरुन अडतीस वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ शेरेबाजी आणि तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देणाऱ्या एका विकृत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अभिषेक तुकाराम गव्हाणे (वय 35 प्लॉट क्रमांक ४ , शिलाविहार ,बिजली सहकारी सोसायटी, नगर , दुसरा पत्ता अभिषेक इंडस्ट्रीज, नागापूर एमआयडीसी ) असे या संशयीत विकृताचे नाव असून अभिषेक तुकाराम गव्हाणे याच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये कलम 504 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक तुकाराम गव्हाणे ( वय 35) याचा बाप तुकाराम बाबुराव गव्हाणे ( वय ६० ) याने काही वर्षांपूर्वी शिलाविहार परिसरात जागा खरेदी करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलेले आहे. सदर प्रकरणी त्याच्या या बांधकामामुळे पीडित कुटुंबास त्रास होत असल्याने महिलेच्या पतीने महापालिका कार्यालयात पाठपुरावा केला मात्र महापालिकेकडून केवळ नोटीस पाठवण्यापलीकडे कुठलीही कारवाई न झाल्याने प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. तुकाराम बाबुराव गव्हाणे याने याआधी देखील या महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यावेळी त्याला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्याच्या वर्तनात फरक पडला नाही आणि ‘ बाप तसा बेटा ‘ पद्धतीने सातत्याने ते वेळोवेळी घराबाहेर येऊन पीडित कुटुंबियांना शिवीगाळ करून धमकी देत होते.

16 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास अभिषेक तुकाराम गव्हाणे आणि त्याचा बाप तुकाराम बाबुराव गव्हाणे या दोघांनी पीडित कुटुंबियांच्या घरासमोर पहार आणि खोरे घेऊन दाखल होत महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. बराच काळ ते शिवीगाळ करत असल्याने अखेर महिलेचा पती सदर प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलेला असताना घरातील 72 वर्षीय सासूला तुकाराम बाबुराव गव्हाणे याने बाहेर बोलावले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. याआधी देखील असा प्रकार सतत घडत असल्याने महिलेने या प्रकाराचा पुरावा म्हणून व्हिडिओ काढायला सुरू केला त्यावेळी आपल्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करत अभिषेक तुकाराम गव्हाणे याने महिलेकडे पाहात अश्लील चाळे केले आणि आणि तिच्या संदर्भात अश्लील शिवीगाळ केली तसेच ‘ माझ्याशी लग्न कर पूर्ण प्लॉट तुझ्या नावावर करीन ‘ असेही तो म्हणाला तसेच ‘ काढ तुला काय फोटो काढायचे आहेत पोलीस अन कोर्ट गेले उडत ‘ असे म्हणत तो फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देखील देत होता तर त्यावेळी त्याचा बाप तुकाराम हा आधी पोलिसांनी नोटीस दिलेली असल्याने शूटिंगमध्ये येऊ नये म्हणून झाडाआड लपत होता.

पोलिस ठाण्यातून महिलेचा पती परत आल्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले संशयीत अभिषेक तुकाराम गव्हाणे याचे अश्लील चाळे आणि शिवीगाळ महिलेच्या पतीने ऐकली आणि त्यानंतर पती-पत्नीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांची भेट घेतली. सदर प्रकरणी कलम 509 अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी केल्यानंतर ज्योती गडकरी यांनी मोबाईल मधील व्हिडिओ पाहून महिलेसोबत चर्चा केल्यानंतर तात्काळ अभिषेक तुकाराम गव्हाणे या विकृताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणी एफआयआर नोंद झालेली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे तर शिलाविहार परिसरात रहायला आपल्यापासून त्यांचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे अनेक नागरिकांचे देखील म्हणणे आहे.