..तर यापुढे जशास तसे उत्तर देणार , माजी मंत्री मधुकर पिचड यांचा इशारा

‘ राज्यात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम करत असताना स्वतंत्र बजेट आणि पेसा कायदा केला त्यामुळे अकोले तालुक्याचे महत्त्वाचे असलेले जलाशय वीज प्रकल्प रस्ते आधी मार्गी लागले मात्र मागील चार वर्षात पिचड यांनी काय केले असे म्हणणाऱ्यांनी आदिवासी विभागाचा पैसा दुसऱ्या विभागाला पगारासाठी वर्ग होत होता तेव्हा तुम्ही झोपा काढत होतात का ‘ असा खडा सवाल माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांना विचारलेला आहे.

काय म्हणाले मधुकर पिचड ?

गोवारी समाजाला आदिवासी मध्ये घेण्यासाठी आंदोलन झाले त्या वेळी 100 पेक्षा अधिक गोवारी मृत्युमुखी पडले. शरद पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन चर्चा केली आणि गोवारी आदिवासीत घेण्याचा आग्रह करत आहेत अशी माझी भूमिका मांडताना घडलेल्या घटनेची मला दुःख झाले मात्र लाखो आदिवासींवर अन्याय होईल म्हणून गृह विभागाची जबाबदारी असताना मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर सुप्रीम कोर्टाने त्यानंतर गोवारी आदिवासी नाहीत म्हणून निकाल दिला त्यामुळे केवळ तालुका नव्हे तर राज्यातील आदिवासींना न्याय देता आला याचा मला सार्थ अभिमान आहे.

मी आदिवासी नाही म्हणून उच्च न्यायालयात विरोधकांनी दावा दाखल केला तेव्हा महादेव कोळी म्हणून न्यायालयाने मला न्याय दिला त्यामुळे तालुक्यातील आदिवासी समाजाचे विरोधक आज निवडणुका लढवू शकले. तालुक्यात राष्ट्रवादीचे पुढारी स्वस्त धान्य काळ्याबाजारात विकतात आणि आणि एज्युकेशन संस्थेच्या बाबत वैयक्तिक टीका करत माझा बाप काढतात . माझा बाप तालुक्यातील जनता जनार्दन आहे यापुढे वैयक्तिक टीका केली तर जशास तसे उत्तर देण्यात येईल.