तालिबानच्या ‘ ह्या ‘ फतव्याने अफगणिस्तान आणखी वीस वर्षे मागे

शेअर करा

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर महिलांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी सरकारने एक नवीन फतवा जारी केला असून त्यानुसार बातम्या देताना बुरखा वापरावा असे प्रमाण काढलेले आहे. देशातील सर्व प्रसार माध्यमांसाठी नियम लागू केल्याने सोशल मीडियावर तालिबानविषयी तीव्र संताप मिळत आहे . बातमी कोणी दिली त्याची विश्वासार्हता काय हे कसे कळणार ? याचे उत्तर कोणाकडेच नाही.

महिलांच्या म्हणण्यानुसार, आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये काम करू नये अशी तालिबानची इच्छा असल्याने ते असले फतवे काढत आहे असे सांगण्यात आलेले आहे. सुरुवातीला तालिबानने महिलांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला. काही महिला प्रसारमाध्यमात आपला प्रभाव निर्माण करत असल्याने तालिबान या विचारसरणीला हे सहन होत नाही असा देखील आरोप महिलांनी केलेला आहे तर महिलांना अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या तालिबानी फतव्यामुळे अफगणिस्तान आणखी वीस वर्षे मागे गेल्याचा दावा एका महिलेने केलेला आहे.


शेअर करा