नागरदेवळे नगरपालिका आपले स्वागत करत आहे , ‘ ह्या ‘ तीन ग्रामपंचायत बरखास्त होणार

शेअर करा

नगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी या तीन गावांची मिळून आता नगरपालिका होणार असून त्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली असून नगरपालिकेच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे असेही ते पुढे म्हणाले.

बुऱ्हाणनगरजवळ असलेल्या नागरदेवळेजवळ भिंगारला लागून असल्याने मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले आहे. तेथील नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत सक्षमपणे निधीच्या अभावी काम करत नसल्याचे दिसून आले होते त्यानंतर परिसरातील नागरिकांकडून देखील नगरपालिका व्हावी म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता त्यावर अखेर अध्यादेश जारी करण्यात आला आणि नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नागरदेवळे, वडारवाडी आणि बाराबाभळी या तीन गावांची मिळून एक नगरपालिका होण्यासाठी लागणाऱ्या निकषांची निकषांच्या कसोटीवर ही गावे बसवली आणि त्यानंतर नगरपालिका अस्तित्वात आली. सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून नगरपालिकेचा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. नागरदेवळे, वडारवाडी आणि बारा बाबळी या ग्रामपंचायती आता बरखास्त केलेल्या असून तिथे नागरदेवळे नगरपालिका अस्तित्वात येणार आहे.


शेअर करा