नगर ब्रेकिंग..चांदणी चौकात रस्ता अडवून वऱ्हाडींची मस्ती , अकरा जणांवर गुन्हे

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून लग्नानंतर घरी जाताना वऱ्हाडी मंडळींनी मस्ती करत रस्त्यात गाडी थांबून फटाके वाजवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.

फैजान निसार जहागीरदार, फैजान हमीद जहागीरदार, मदन मिर्झा मोहम्मद, जीशान जहागीरदार, सोहेल शेख, अश्रफ नदीम जहागीरदार, सलमान शेख, रेहान कुरेशी, अजीम सिमला वाला, झेजान शेख, कलीम सादिक जहागीरदार ( सर्वजण राहणार झेंडीगेट ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे आधीच वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या या रस्त्यात आणखीनच अडचण निर्माण झाली होती. बराच काळ रस्ता अडवून त्यांचा हा प्रकार सुरू होता.

नगर शहरातील चांदणी चौकात वऱ्हाडी मंडळींनी गाडी थांबवून गाडीच्या समोर फटाके वाजवून आरडाओरडा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. सदर प्रकार हा भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिरीष कुमार देशमुख यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करून कारवाईचा आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा