फेसबुक गर्लफ्रेंड निघाली पोलिसाच्या पण पुढची ..’ असा ‘ मास्टरप्लॅन घेऊन गाठले डेटचे लोकेशन की …

  • by

सोशल नेटवर्किंग साइटवरून झालेली मैत्री अनेकदा गोत्यात आणते हे आजवर आपण ऐकले होते मात्र कधीकधी याचा फटका सामान्य व्यक्तीलाच नव्हे तर चक्क पोलिसांना देखील बसू शकतो याचा प्रत्यय येणारी घटना मध्य प्रदेशातील इंदूर इथे घडली आहे . सोशल नेटवर्किंगवर केलेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट्स आणि पोलिसाने केलेल्या तसल्या मागण्या या आधारावर त्या पोलिसाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र त्याहून अजब म्हणजे तक्रार करणारी महिला ही त्याची लग्नाची बायको आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सत्यम नामक व्यक्ती इंदूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. सत्यमचं लग्न २०१९ मध्ये झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच सत्यम पत्नीचा हुंड्यासाठी छळ करू लागला. शेवटी पत्नीने वैतागून इंदूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार केली. मात्र त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे तो सोकावला . काहीच कारवाई न झाल्याने हतबल झालेली सत्यमची पत्नी आपल्या माहेरी सुखालिया येथे निघून गेली. पैसे देत नाही तर तिचा काय फायदा असे समजून ती गेल्यानंतर सत्यमने देखील तिच्याशी संपर्क तोडून टाकला.

बायको जरी माहेरी गेली तरी तिला नवऱ्याची आठवण येत होतीच तर इकडे सत्यम मात्र दुसरे कोण भेटते का ? याच्या शोधात होता . माहेरी गेल्यावर बायकोने फेसबुकवर रुही या नावाने प्रोफाइल तयार केलं. त्याच अकाउंटवरून तिनं सत्यमला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. सत्यमने ती आनंदने स्वीकारली त्याला अंदाजच आला नाही की ही आपली पत्नी असू शकेल. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. प्रेमाच्या गप्पाही रंगू लागल्या. फेसबुकवर गप्पा मारता मारता तो प्रेम आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी गप्पा करायचा तसेच भेटण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला.

सतत करत असलेल्या सत्यमच्या हट्टामुळे अखेर ती त्याला भेटण्यासाठी तयार झाली. दोघांनी मिळून डेटसाठी एक लोकेशन निवडले आणि तिथे तो तिची वाट पाहत होता. अखेर ती डेटवर पोहचली आणि सत्यमने तिला पाहिलं आणि त्याला मोठा धक्काच बसला. जिच्यासोबत आपण आजवर जे जे काय बोललो ती आपली पत्नी आहे हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर बायकोने त्याला चांगलेच सुनावले आणि इंदूर पोलिसांत सत्यमविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याआधी देखील तिने तक्रार दाखल केली होती मात्र तिच्याकडे कोणतेच पुरावे नव्हते . रुही बनून तिने सत्यमच्या चॅटिंगचे काही ‘जबरदस्त नमुने ‘ आणि इतरही काही ‘ काढलेले स्क्रीनशॉट’ पोलिसांकडे पुरावे म्हणून दिलेले आहेत . अचानक झालेल्या या प्रकाराने सत्यमचा देखील चांगलाच पोपट झाला असून इंदूर पोलिसांनी कॉन्स्टेबल सत्यमच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.