पुण्यात खळबळ..कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शेअर करा

पुणे तिथे काय उणे म्हणतात ते काही खोटं नाही अशीच एक वेगळी बातमी पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीला आलेली असून कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 1 मे 2021 रोजी हा प्रकार पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

सदर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची भनक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम साठे यांना लागली. त्यांनी 23 तारखेला पिंपरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे आणि त्यानुसार 10 ते 12 वर्षे वयाच्या मुलाच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर मुलाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हातात एक कोंबडी पकडलेली आहे आणि त्या कोंबडीसोबत त्याने अश्लील वाटावे अशा स्वरुपाचे कृत्य केलेले आहे. हा व्हिडीओ अत्यंत छोटा असून केवळ 875 केबी साईजचा आहे मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.


शेअर करा