तिला दिवस गेल्याचे समजताच ‘ तो ‘ फरार झाला होता मात्र प्रेयसीचे असे धाडस की ?

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना बिहार इथे समोर आलेली असून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पलायन केलेल्या एका तरुणाला तरुणीने चांगलाच धडा शिकवला आहे .तरुणीने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं. त्यातून दिवस गेल्यावर लग्नाआधीच तो फरार झाला आणि त्याने लग्नाला नकार दिला. तरुणी 5 महिन्यांची गरोदर होती मात्र तिने पोलीस ठाणे गाठत त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सदर घटना बिहारच्या जहानाबाद इथली असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सदर मुलीचे नाव हे मुन्नी कुमारी असून तिने पोलिसांना झालेला सगळा प्रकार कथन केला. आपल्यासोबत झालेली फसवणूक सांगताना मुन्नीचे अश्रु थांबत नव्हते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आणि त्यानंतर सुरुवातीला माज दाखवणारा सोने लालकुमार याला कळालं की पोलीस आपला शोध घेत आहेत. तेव्हा त्याला घाम फुटला अन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवताच तो पोपटासारखं बोलू लागला आणि पोलिसांनी या दोघांचे मंदिरात लग्न लावून दिलं.

मुलीच्या कुटुंबीयांनी माहिती दिली की, ‘आरोपी मुलगा आणि मुलगी दोघे सुद्धा काको प्रखंड इथल्या काली इथले रहिवासी असून इथेच यांची भेट होत होती. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि एके दिवशी मुलीची तब्बेत बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कुटुंबीयांना मुलगी गर्भवती असल्याची माहिती दिली. मुलीचे कुटुंबीय लग्नास तयार होते मात्र मुलाने नकार दिला म्हणून प्रकरण पोलिसांत गेलं आणि पोलीस ठाण्यातच शेवट गोड झाला .


शेअर करा