पुण्यात खळबळ..प्रियकराच्या खुनाचा बदला म्हणून प्रेयसी बिथरली अन ..

शेअर करा

पुणे शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या झालेल्या खुनाचा बदला म्हणून प्रेयसीने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पुणे शहरातील काळेपडळ येथील ही घटना असून तरुणीचा प्रियकर असलेला सराईत गुन्हेगार सनी हिवाळे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या प्रेयसीने आक्रमक रूप धारण केले होते.

उपलब्ध माहितीनुसार, त्याच्या प्रेयसीने रविवारी रात्री काही तरुण आणि काही अल्पवयीन साथीदार हाताशी धरत एका स्टॉलधारकावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याचे नुकसान केले. सदर प्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात चार जण हे अल्पवयीन आहेत.

विठ्ठल धनंजय चौगुले ( वय 19 राहणार हडपसर ), ऋषिकेश भारत पांचाळ ( वय 20 राहणार उरुळी देवाची ) , चैतन्य तुळशीराम कराड ( वय 23 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हिवाळे याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र 9 एप्रिल रोजी तो येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी टोळीकडून 12 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा खून झाला तेव्हापासून त्याची प्रेयसी ही बिथरलेली होती आणि त्यातून तिने हा प्रकार केल्याचे समजते.


शेअर करा