‘ पारनेर आणि राहुरीत टॉस करून तुम्हीच ठरवा ‘, मनमाड रस्त्यावरून सुजय विखेंचा टोला

शेअर करा

नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर मनमाड रस्त्याचे काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे असून देखील पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत असे सांगत सदर कामात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी टक्केवारी मागत आहेत असा घणाघाती आरोप केलेला आहे.

डॉक्टर सुजय विखे यांच्या खासदारकीला तीन वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने मागील तीन वर्षातील आपण केलेल्या कामांचा आढावा पत्रकारांसमोर मांडला. त्या वेळी ते म्हणाले की, ‘ नगर- करमाळा, नगर-जामखेड, नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, सुरत- हैदराबाद रस्ता ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून वेगाने पूर्ण केली जात आहेत. एका वर्षात ही कामे मार्गी लागतील मात्र नगर मनमाड रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने होत नसून या कामात ठेकेदाराला महाविकास आघाडीच्या एका लोकप्रतिनिधीने टक्केवारी मागितली आहे म्हणून हे काम परवडत नसल्याने ठेकेदार काम थांबवत आहे.

टक्केवारी मागणारा लोकप्रतिनिधी कोण आहे याबद्दल सुजय विखे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ नगर ते शिर्डी दरम्यान चार लोक प्रतिनिधी येतात. शिर्डी मतदारसंघात माझे वडील आहेत म्हणून त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही आणि नगर दक्षिणमध्ये मी खासदार आहे त्यामुळे माझ्या विषयी बोलणार नाही. आता राहिले पारनेर आणि राहुरीत टॉस करून तुम्ही ठरवा ‘, असा देखील टोला त्यांनी मारला आहे.


शेअर करा