पोस्टातील लोकांचे पैसे चक्क परस्पर ‘ ह्या ‘ व्यवसायात , दोन वर्षांपासून सुरु होता खेळ

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना मध्यप्रदेशात उघडकीला आलेली असून मध्य प्रदेशात एका पोस्टमास्टरने अनेक ठेवीदारांचे तब्बल सव्वा कोटी रुपये इंडियन प्रीमियर लीग अंतर्गत सट्टेबाजीत उडवले आहेत. बनावट पासबुक द्वारे दोन वर्षांपासून याच पद्धतीने नागरिकांना गंडा घालत होता. सदर पोस्टमास्टर विशाल अहिरवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील हा रहिवाशी असून एका टपाल कार्यालयात पोस्टमास्टर म्हणून तो काम करायचा. ग्राहकांकडून लाखो रुपये घेत त्यांना मुदत ठेवी बद्दलचे बनावट पासबुक द्यायचा आणि हातात आलेला पैसा आयपीएलमध्ये लावायचा. नागरिक जेव्हा त्यांचे पैसे परत घ्यायला आले त्यावेळी त्यांना टपाल खात्यात आपल्या नावाने खात्याचं असल्याचे समजल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विशाल याने दोन वर्षात तब्बल चोवीसपेक्षा अधिक लोकांची फसवणूक केली असून जवळपास सव्वा कोटी रुपये लुटून आयपीएलमध्ये लावले होते. सदर प्रकरणी विशालच्या विरोधात फसवणूक आणि गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याने फसवणूक केलेल्या अनेक नागरिकांमध्ये वयोवृद्ध लोक देखील आहे.

कोरोना महामारी मध्ये पती गमावल्यानंतर अशी फसवणूक झाल्यानंतर आपल्याला काहीच सुचत नाही अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली असून तिने नऊ लाख रुपये टपाल खात्यात गुंतवणूक केली होती मात्र आता मुलांचे भविष्य अंधारात सापडल्याचे तिचे म्हणणे आहे.


शेअर करा