अफगाणिस्तानमध्ये ‘ त्या ‘ सक्तीच्या विरोधात महिलांच्या सोबत पुरुषही एकवटले

शेअर करा

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर महिला वृत्तनिवेदक यांना तोंडावर बुरखा काढण्याचे आदेश देण्यात आले असून बातम्या देताना देखील तोंड झाकून बातम्या द्याव्यात असे अघोरी फर्मान काढण्यात आलेले आहे मात्र आता त्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिला वृत्तनिवेदक यांच्या समर्थनार्थ पुरुष सहकारी देखील समोर आलेले आहेत.

विरोधाचा भाग म्हणून तालिबान प्रशासनाच्या विरोधात पुरुष सहकाऱ्यांनी देखील चेहरा झाकून वृत्तनिवेदन केलेले आहे. महिलांच्या सोबत पुरुष देखील चेहरा झाकून बातम्या देत असल्याचे अफगाणिस्तानमधील मुख्य वाहिनी असलेल्या टोलो न्यूज येथे दिसून आले आहे. महिलांच्या सोबत या आंदोलनात पुरुषांनी देखील सहभाग नोंदवला यामुळे त्यांचे सोशल मीडियावर मोठे कौतुक केले जात आहे.

प्रसारमाध्यमांसाठी असलेली बंधने ही अन्यायकारक ठरत असून त्याचा निषेध करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रकार देखील या मोहिमेला पाठिंबा देत आहेत तसेच जगभरातील नेटिझन्स देखील आपापल्या पद्धतीने या निर्णयाविषयी संताप व्यक्त करत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने सार्वजनिक ठिकाणी महिलांनी त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकावा असा आदेश दिला होता. सध्यातरी अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणात महिलांकडून या निर्णयाचे पालन होत आहे असे दिसून येत आहे.


शेअर करा