पुणे ब्रेकिंग..अनैतिक संबंधांतून जन्मलेले बाळ लपवू तरी कुठे ? महिलेने लढवली शक्कल अन ..

शेअर करा

पुणे शहरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर भागात सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे. सदर प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ लपवायचे तरी कुठे म्हणून तिने हा धक्कादायक प्रकार केला आहे . बाळाला वाचवण्यात यश आले असून त्याला स्वच्छतागृहाच्या भांड्यात दाबून आता लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत मात्र थोड्यात त्याचा जीव वाचला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वडगांव बुद्रुक परिसरातील तुकाईनगर भागात एक जोडपे गेल्या पाच वर्षापासून राहत आहे. संबधित महिला गर्भवती होती मात्र अनैतिक संबंधांतून झालेला हा प्रकार लपवावा म्हणून ती चक्क घराबाहेर देखील पडत नव्हती . बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती परिसरातील स्वच्छ्तागृहात गेला असता तेव्हा त्याला लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. स्वच्छतागृहात हा काय प्रकार आहे म्हणून त्याने पाहिले असता स्वच्छ्तागृहाच्या भांड्यामधे जिवंत अर्भक दिसून आले.

सदर प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर महिलेला परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून तपासासाठी ताब्यात घेण्यात आले त्यावर तिने ‘ मी प्रातःविधीसाठी गेले होते. मला काही माहित नाही ‘ असे सांगितले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच महिला पोपटासारखी बोलू लागली .सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने चिमुकले बाळ भांड्यातून वरती काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण होते म्हणून त्यांनी हाताला तेल लावून त्या चिमुकल्या बाळाला भांड्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथील ही घटना असून परिसरात या मातेविषयी संताप व्यक्त केला जात असून तिच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


शेअर करा