आधी भररस्त्यात पेटली मग गाढवाला बांधली आणि आता तर हद्दच झाली

शेअर करा

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे अनेक नागरिक इंधन खर्च कमी व्हावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत मात्र सुरक्षेच्या बाबतीत इलेक्ट्रिक वाहने अत्यंत कमकुवत ठरत असून अशीच तिसरी घटना ओला स्कूटरच्या बाबतीत घडलेली आहे.

पुणे शहरात सुरुवातीला एका ओला स्कूटरने पेट घेतला होता त्यानंतर बीड जिल्ह्यात अवघ्या सहा दिवसात नादुरुस्त झालेली ओला स्कुटर एका संतप्त ग्राहकांने गाढवाला बांधून फिरवली होती त्यानंतर आता तिसरी घटना समोर आलेली असून ‘ ओला एस एक प्रो ‘ या गाडीचे पुढचे चाक निखळून पडल्याची बातमी समोर आलेली आहे.

सातत्याने ओला स्कूटर संदर्भात अनेक तक्रारी येत असताना त्यात आणखी एक भर पडलेली आहे त्यामुळे कंपनीच्या स्कूटरचा दर्जा याबद्दल नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षेच्या दर्जातून ही स्कूटर वापरणे धोकादायक असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक देत आहेत.

नुकत्याच उघडकीला आलेले या घटनेने श्रीनाद मेमन या ग्राहकाची ही स्कूटर असून मेनन यांनी तुटलेल्या स्कूटरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. त्यात त्यांनी गाडीचा स्पीड हा अत्यल्प असतानादेखील पुढचे चाक तुटून पडले असे म्हटले आहे. सोबतच सदर बाब ओला इलेक्ट्रिकच्या अधिकाऱ्यांना आपण सांगितलेली असून त्यांनी दखल घेऊ असे उत्तर दिले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


शेअर करा