कोरोनानंतर ‘ ह्या ‘ आजाराविषयी जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

शेअर करा

कोरोना संकटातून जग बाहेर पडत असतानाच आता मंकीपॉक्स या आजाराचे संकट वाढताना पाहायला मिळत आहे. जगभरात 20 पेक्षा अधिक देशांमध्ये आतापर्यंत या आजाराचे दोनशे रुग्ण आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली आहे. सदर प्रकार हा मोठ्या प्रमाणावर आजाराचा उद्रेक असे म्हणता येणार नाही मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास या आजारावर लसी आणि औषधाचा पुरेसा साठा करण्याची गरज आहे, असे देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे

वेगवेगळ्या देशांमध्ये मंकीपॉक्स कसा पोहोचला याचे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित असून सुरुवातीला हा आजार फक्त मध्य आणि पश्चिम आफ्रिकेपर्यंत मर्यादित होता मात्र अवघ्या काही कालावधीत यूरोपीय राष्ट्रासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथे देखील या आजाराचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळत आहेत. मंकीपॉक्स या आजारात अद्यापपर्यंत तरी जनुकीय बदल झालेला नाही ही निदान समाधानाची बाब आहे.

आफ्रिकन राष्ट्रांमध्ये मानवाला मंकीपॉक्स होण्याचे कारण हे प्रामुख्याने जंगली प्राण्यांचे मांस भक्षण आणि त्यांच्याशी असलेला संपर्क हे आहे तर युरोपीय राष्ट्रांमध्ये समलैंगिक संबंध देखील या आजारांसाठी कारणीभूत होत असल्याचे दिसून आले आहे. अद्यापपर्यंत गरीब राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या स्पेनमध्ये सर्वाधिक 98 रुग्ण आढळले असून या रुग्णांमध्ये समलैंगिक रुग्णांची संख्या जास्त आहे.


शेअर करा