पुणे हादरलं..वृद्ध नागरिकाला ‘ फ्रेंड्स क्लब ‘ चा मोह झाला अन रोशनीच्या संपर्कात येताच..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुणे शहरानजीक देहूरोड येथे उघडकीला आलेली असून फ्रेंड्स क्लबमध्ये जॉईन करून घेण्याचे आमिष दाखवून एका साठ वर्षीय व्यक्तीला तब्बल 96 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. फ्रेंड्स क्लब नावाने दुसऱ्याच एका संस्थेचे प्रमाणपत्र पाठवून त्यांची फसवणूक करण्यात आली. सदर गुन्हा 23 ते 25 तारखेच्या दरम्यान घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुधीरकुमार श्रीरामपरीक्षण ठाकूर ( वय 60 राहणार देहूरोड ) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून आपल्या सोबत झालेल्या या फसवणुकीच्या प्रकारानंतर त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोशनी नामक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

संशयित महिलेने सुधीर कुमार यांना फोन करून आमचा फ्रेंड्स क्लब असून त्यामध्ये आम्ही व्यायाम, हसणे, खेळणे, नवीन मित्र मैत्रिणी अशा अनेक गोष्टी असतात अर्थात त्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागेल आणि त्यानंतर या सर्व सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध होतील असे सांगत फिर्यादी यांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

त्यानंतर रोशनी हिने गुगल पेच्या माध्यमातून वेळोवेळी करत तब्बल 96 हजार रुपये घेतले आणि त्यानंतर फिर्यादी यांना ड्रीम नाईट डेटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे बनावट प्रमाणपत्र देखील पाठवले मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत रोशनी हिच्याविरोधात फिर्याद दिलेली आहे.


शेअर करा