कालीचरण याचे ‘ पुन्हा ‘ एकदा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य , म्हणाला की ?

शेअर करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात सापडलेला कालीचरण महाराज याने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले असून, ‘ मुसलमानांनी हिंदूंची 500000 प्रार्थनास्थळे पाडलेली आहेत ती मिळवणे गरजेचे आहे. मुस्लिमांचे शंभर टक्के मतदान हे इस्लामसाठी होत असून हिंदू मात्र केवळ पेट्रोल-डिझेल किमतीत अडकलेले आहेत. इस्लाम हा धर्मच नाही. फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन हिंदु धर्म ‘, असेही तो पुढे म्हणाला.

कालीचरण हा सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्याने भद्रकालीचे काल रात्री दर्शन घेऊन आरती केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी, ‘ पंतप्रधान मोदी,अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाला तारतील. हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मान आहे. मी मोदींच्या कामावर प्रसन्न झालो आहे. जो हिंदू हिताचे बोलेल त्याला माझा पाठिंबा असेल, ‘ असेही तो पुढे म्हणाला.

दगडूशेठ मंदिरात शरद पवार यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात न जाता बाहेरून मुखदर्शन घेतले होते त्यावर देखील कालीचरण याने आपले मत प्रदर्शित करताना, ‘ शरद पवार यांचे वैयक्तिक आयुष्य आहे मात्र सोशल मीडियामुळे प्रत्येक नेत्याची भूमिका लोकांना कळते ‘, असे म्हटले आहे.


शेअर करा